कॉंग्रेसने राज्यांचे प्रभारी बदलले

अल्पेश ठाकोर यांच्याकडे सोपविली बिहारची जबाबदारी


चल्ला वामशी रेड्डी आणि बी. एम. संदीप महाराष्ट्राचे प्रभारी

नवी दिल्ली – 2019 च्या लोकसभा निवडणुकांआधी कॉंग्रेसकडून राज्यांचे प्रभारी बदलले जात आहेत. गुजरातमधील ओबीसी समाजाचा चेहरा बनलेले अल्पेश ठाकोर यांच्याकडे कॉंग्रेसने बिहार राज्याचे प्रभारीपद दिले आहे. बिहारमधील सध्याची राजकीय स्थिती पाहता, कॉंग्रेसने अल्पेश ठाकोर यांची प्रभारीपदी नियुक्ती करुन अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे. तर चल्ला वामशी रेड्डी आणि बी. एम. संदीप यांना महाराष्ट्राचे प्रभारी करण्यात आले आहे.

बिहारच्या राजकारणात गेल्या तीन दशकांपासून मागासवर्गीय समाजाचा दबदबा आहे. हा दबदबा सुरु झाल्यापासून कॉंग्रेस बिहारमध्ये सत्तेपासून दूर आहे. त्यामुळे आता ओबीसी नेत्याला बिहारच्या प्रभारीपदी नियुक्त करुन कॉंग्रेसने बिहारमध्ये विशेष लक्ष घालण्यास सुरुवात केली असल्याचे मानले जाते आहे.

दरम्यान, तृणमूल आणि भाजपच्या राजकाराणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये कॉंग्रेसने तीन नवे सचिव नियुक्त केले आहेत. बी. पी. सिंह, मोहम्मद जावेद आणि सरत राऊत यांना पश्‍चिम बंगालचे प्रभारी करण्यात आले आहे.

जम्मू-काश्‍मीरच्या प्रभारीपदाची जबाबदारी शकील अहमद खान यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. रायबरेलीच्या कॉंग्रेस आमदार आदिती सिंह यांना उत्तर प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस करण्यात आले आहे. राजेश धमानी यांच्याकडे उत्तराखडंचे प्रभारीपद देण्यात आले आहे.

राहुल गांधी हे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पक्षांतर्गत अनेक बदल केले जात आहेत. वरील नियुक्‍त्या हाही त्याच बदलांचा भाग मानला जात असून, राहुल गांधी हे या बदलांमध्ये नव्या आणि तरुण चेहऱ्यांना अधिक संधी देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)