कॉंग्रेसने मोदींची तुलना केली औरंगजेबाशी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत आणिबाणीवरून कॉंग्रेसवर जोरदार हल्ला केल्यानंतर आज कॉंग्रेसनेही त्यांच्यावर औरंगजेबाचा शिक्का मारून पलटवार केला आहे. मोदींच्या टीकेला उत्तर देताना कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की, मोदींनी आपल्या चार वर्षांच्या कारकीर्दीत सर्वत्र दहशतीचे वातावरण तयार केले असून त्यांची ही कारकिर्द औरंगजेबाच्याच राजवटीची आठवण करून देणारी आहे. या नव्या औरंगजेबाच्या काळात सरकारला प्रश्‍न विचारणारांना देशद्रोही ठरवले जात असून दलित, मुस्लिम आणि अन्य कमजोर घटकांतील लोकांना जाहींरपणे फटकावले जात आहे.

मोदींनी आज कॉंग्रेसवर आणिबाणीवरून केलेली टीका म्हणजे इतिहासातीाल जुन्या घटनांचे दाखले पुढे करून स्वत:च्या सरकारचे चार वर्षांचे अपयश लपवण्याचाच केविलवाणा प्रयत्न आहे. असे करण्याने स्वता मोदीच एकदिवस इतिहास जमा होतील अशी टिपण्णीही सुर्जेवाला यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान दुसरे एक कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी या प्रकरणी म्हटले आहे की मोदींनी देशावर चार वर्ष अघोषित आणिबाणी जारी केल्याबददल ते कधी माफी मागणार आहेत?. 1977 च्या आणिबाणी बद्दल इंदिराजींनी लोकांची माफी मागितली होती व लोकांनीही त्यांना पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून दिले होते याचीही आठवण पटेल यांनी करून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)