कॉंग्रेसने भारतीय सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं बंद करावं…

सर्जिकल स्ट्राइकवरुन रविशंकर प्रसाद यांची टिका
नवी दिल्ली – सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडीयो समोर आल्यानंतर उडालेल्या आरोप प्रत्यारोपानंतर भाजपाच्या रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसवर टिका केली असून यावेळी बोलताना प्रसाद म्हणाले कॉंग्रेसने भारतीय सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं बंद करावं कारण त्यामुळे भारतीय सैन्याचे मनोधैर्य खच्ची होते आहे आणि याच्यामुळे पाकिस्तानला आनंद होतो.

ते पुढे म्हणाले की, कॉंग्रेस दहशतवाद्यांची हिंमत वाढवत आहे, तसंच भारतीय लष्कराचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे असेही त्यांनी नमूद केले. कॉंग्रेस नेत्यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानला आनंद होत आहे. ते कॉंग्रेसला प्रमाणपत्र देणार आहेत असा टोलाही रवीशंकर प्रसाद यांनी लगावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले “भारतीय सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं बंद केलं गेलं पाहिजे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राइकला “खून की दलाली’ म्हटलं होतं. राहुल गांधींकडून यापेक्षा जास्त अपेक्षा केली जाऊ शकत नाही. कारण त्यांची आई सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना “मौत का सौदागर’ म्हटलं होतं. तसेच “कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणतात की जवान दहशतवाद्यांना कमी आणि नागरिकांना जास्त मारत आहेत. कॉंग्रेसच्या अशा वक्तव्याने पाकिस्तान आनंदी होत आहे. आपल्याला या सर्व गोष्टी बाजूला ठेवून विचार केला पाहिजे’, असंही रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
“कॉंग्रेस वारंवार होणाऱ्या आपल्या पराभवामुळे हताश झाली आहे. यामुळे ते वारंवार लष्कराचं मनोधैर्य खच्ची कऱण्याचा प्रयत्न करत आहे. लष्कराचं बजेट कमी केल्याचा कॉंग्रेसचा आरोपही चुकीचा आहे असे त्यांनी सांगितले.

कॉंग्रेसला द्राक्ष आंबट – सुब्रमण्यम स्वामी
खासदार सुब्रमण्यम स्वामी कॉंग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की. “केवळ कॉंग्रेसला अशा प्रकारचा व्हिडिओ जारी करता आला नाही, म्हणून आम्ही हा व्हिडिओ व्हायरल करू नये काय? हा व्हिडिओ बाहेर आल्याने लोक भाजपच्या बाजूने कसे काय होतील? जर आपण काही केलं आहे तर ते लपवायचं कशाला?,’ असा सवाल करत कॉंग्रेसचा आरोप म्हणजे कोल्ह्याला द्राक्षं आंबट असा प्रकार आहे, अशी टीका स्वामी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)