कॉंग्रेसने घेतला ममतांच्या वक्तव्याला आक्षेप…

गुवाहाटी – ममता बॅनर्जी यांनी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्सच्या विषयावरून देशात यादवी युद्ध होईल आणि रक्ताचे पाट वाहतील असे जे विधान केले आहे त्याला कॉंग्रेसनेही आक्षेप घेतला आहे.

आसाम प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष रिपुन बोरा यांनी म्हटले आहे की ममतांनी अशा प्रकारची प्रक्षोभक वक्तव्ये करून लोकांना भडकवण्याचे काम करू नये. त्यांच्या वक्तव्याचा आसामातील जनतेवर काहीही परिणाम होणार नाहीं.त्या राज्यात पुर्ण शांतता आहे. ममतांच्या या आक्षेपार्ह विधानांचा आम्ही निषेध करतो असेही त्यांनी म्हटले आहे. या विषयावरून कॉंग्रेसनेच अशी प्रतिक्रीया दिल्याने ममता बॅनर्जी आता एकट्या पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)