कॉंग्रेसच मराठा समाजा आरक्षण मिळवून देईल

वडूज,  (प्रतिनिधी) – कॉंग्रेसच्यावतीने काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा सोमवारी सायंकाळी वडूज येथे आली. यावेळी मराठा आरक्षणाचा नामोल्लेख फ्लेक्‍स बोर्डवरून टाळल्याने
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ही यात्रा अडवली. यावेळी कॉंग्रेस पक्षच आरक्षण मिळवून देईल, अशी ग्वाही जनसंघर्ष यात्रेतील दिग्गज नेतेमंडळींनी दिली.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, आ. जयकुमार गोरे, बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, डॉ. सुरेश जाधव, धैर्यशील कदम, धनंजय चव्हाण, तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, महेश गुरव, श्रीकांत बनसोडे, संजय काळे, विशाल बागल आदी मान्यवर यात्रेत सहभागी झाले होते.
मराठा क्रांती मोर्चाचे अनेक कार्यकर्ते येथे थांबले होते. छत्रपती संभाजीराजे चौकात ही यात्रा आल्यानंतर कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी करून ही जनसंघर्ष यात्रा रोखली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी गाडीतून उतरून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. मराठा समाजाचे आरक्षणाचा मुद्दा गेली काही महिने राज्यात गाजत आहे. या मुद्याचा जनसंघर्ष यात्रेच्या तालुक्‍यातील फ्लेक्‍स बोर्डवर नामोल्लेख दिसून येत नाही. आरक्षणाच्या विषयाचा पक्षाला विसर पडला काय? ही जनसंघर्ष यात्रा ज्या ज्या भागांत जाईल त्या-त्या ठिकाणी कॉंग्रेस पक्षाने आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात कॉंग्रेस पक्षाने कायदा करून ठोस कार्यवाही केली असती तर आज जनसंघर्ष यात्रा काढण्याची गरज पडली नसती, असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. त्यावेळी कॉंग्रेस पक्षच तुम्हाला आरक्षण मिळवून देईल, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे मान्यवरांनी मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सांगितले व देण्यात आलेले निवेदन स्विकारले.
येथील छत्रपती संभाजीराजे चौकात भ्रष्टाचार सरकार असे लिहून बांधण्यात आलेली दहिहंडी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी फोडली. त्यानंतर हुतात्मा स्मारकात हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही जनसंघर्ष यात्रा पुढील मार्गाकडे रवाना झाली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते व संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजय शिंदे, नगरसेवक शहाजी गोडसे, विनोद शिंदे, माजी सरपंच अंकुश दबडे, पृथ्वीराज गोडसे, नगरसेवक अभय देशमुख, डॉ. संतोष गोडसे, अक्षय थोरवे, संतोष देशमुख, अजय खुस्पे, गणेश गोडसे, धनाजी गोडसे, दिलीप मांडवे, लालासाहेब गोडसे आदी उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)