कॉंग्रेसच्या विजयाचा पारगावात जल्लोष

केडगाव- दौंड तालुका निष्ठावंत कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पारगाव येथे तीन राज्यांतील निवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. नुकत्याच देशातील छत्तीसढ, राजस्थान, तेलंगण, मध्यप्रदेश आणि मिझोरम या पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये तीन राज्यांत कॉंग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवले. या विजयाचा दौंड तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने फटाके वाजवून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष पोपट ताकवने, सुरेश ताकवने, रोहीदास ताकवने, दत्तात्रय आल्हाट, नितीन बोत्रे, कैलास बोत्रे, सुनील बोत्रे, संपत फडके, रामकृष्ण ताकवने, चंद्रकांत शिशुपाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)