कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तीर्थक्षेत्रांचा दौरा करावा

चिंचवड – कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांनी पक्षात नवी चेतना निर्माण करण्यासाठी तसेच पक्षाला मजबुती देण्यासाठी तीर्थक्षेत्रांचा दौरा करावा, अशी अपेक्षा चिंचवड विधानसभा ब्लॉक कॉंग्रेस कमिटीने व्यक्‍त केली आहे.

सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, राजीव सातव, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांची चिंचवड ब्लॉक कॉंग्रेस कमिटीने नवी दिल्ली येथे पक्षाच्या अधिवेशनापूर्वी भेट घेतली. सर्व वरिष्ठ नेत्यांना संत तुकाराम महाराज गाथा आणि ज्ञानेश्‍वरीची मराठी व इंग्रजी प्रत सर्व वरिष्ठ नेत्यांना भेट दिली. श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र देहु, देहुरोड येथील डॉ. आंबेडकर भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे भेट द्यावी, अशीही मागणी केली.

कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तीर्थक्षेत्राचा दौरा केल्यामुळे कॉंग्रेस पक्षाला फायदा होईल. तसेच महाराष्ट्रातील गावा-गावांत चांगला संदेश जाईल. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला एक नवी चेतना मिळू शकते आणि पुन्हा कॉंग्रेसला मजबुती मिळेल. या संदर्भात स्थानिक नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली, अशी माहिती चिंचवड विधानसभा ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी एका प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)