कॉंग्रेसच्या भारत बंदला द्रमुकचा पाठिंबा

चेन्नाई – इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसने येत्या 10 तारखेला भारत बंदचे आयोजन केले आहे त्याला तामिळनाडुतील द्रमुक पक्षाने पाठिंबा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी ही घोषणा करताना म्हटले आहे की आमचा पक्ष या बंद मध्ये सहभागी होईल आणि तो शंभर टक्के यशस्वी करून दाखवेल. समाजातल्या सर्वच घटकांनी या बंदमध्ये सहभागी होऊन भाजपला धडा शिकवला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

त्यांनी या संबंधात प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आज पेट्रोलच्या िंकंमती वेगाने शंभर रूपयांकडे चालल्या आहेत. वास्तविक आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमती घसरलेल्या असताना त्याचा लाभ जनतेला करून देण्याऐवजी सरकारनेच आपल्या तुंबड्या भरल्या आणि लोकांच्या पैशाची लूट केली असा आरोप त्यांनी केला.

या सरकारला सामान्य जनतेच्या हिताशी काही देणेघेणे नाही. केवळ निडणुकीपुरत्या या किंमतीची वाढ हे सरकार रोखून धरते आणि निवडणूका संपल्या की त्याची पुन्हा भाववाढ होते यातूनच भाजपचा मनसुबा उघड होतो असेही त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)