कॉंग्रेसच्या नेतृत्वाकडून दहशतवाद्यांना पाठिंबा : स्मृती इराणी

अमित शहांना लक्ष्य करण्यासाठी सीबीआयचा वापर 

नवी दिल्ली: राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी कॉंग्रेस पक्ष काय करू शकतो, याचे सोहराबुद्दीन शेख चकमकीचे उदाहरण आहे, असा आरोप आज भाजपच्यावतीने करण्यात आला. कॉंग्रेस सत्तेवर असताना अमित शहा यांना लक्ष करण्यासाठीच्या कारस्थानाचा भाग म्हणून सीबीआयचा वापर करण्यात आला होता, असा आरोप भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेसच्या नेतृत्वाने सीबीआयचा वापर करून गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि मंत्री अमित शहा यांना त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला. अमित शहा यांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठीच पुरावे तयार केले गेले होते, असे त्या म्हणाल्या. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोहराबुद्दीन शेख प्रकरणाच्या निकालावर केलेल्या ट्‌विटचा हवाला देऊन ते दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोपही इराणी यांनी केला.

सोहराबुद्दीन शेख प्रकरण हे अमित शहा यांच्यावर राजकीय कारणासाठी लादण्यात आले आहे, हे मुंबई उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे कारस्थान पराभूत झाले आहे, असे इराणी म्हणाल्या. गॅंगस्टर सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसर बी आणि त्याचा साथीदार तुलसी प्रजापती यांना बनावट चकमकीत ठार केल्याच्या प्रकरणातून अमित शहा यांच्यासह सर्व 22 आरोपींना पुराव्याअभावी मुक्‍त करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)