कॉंग्रेसच्या ओबीसी प्रदेश कार्याध्यक्षपदी अकलूजचे ऍड. अमित कारंडे

अकलूज – कॉंग्रेसच्या राज्य कार्यकारिणीत झालेल्या बदलात इतर मागासवर्गीय कॉंग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी येथील ऍड. अमित कारंडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ऍड. कारंडे हे मूळ अकलूजचे असून, ते मुंबईत वकिली व्यवसाय करतात. ते गेल्या काही वर्षांपासून कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, तसेच पक्षाच्या राज्य कार्यकरिणीवरही काम करीत आहेत. त्याच दरम्यान पक्षाच्या राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या फेररचने संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ओबीसींबाबत घेतलेल्या बैठकांमध्ये संघटनेमध्ये निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलण्याच्या आणि सक्रिय पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ओबीसी प्रदेश अध्यक्ष प्रमोद मोरे, प्रदेश समितीमध्ये बदल करीत ऍड. अमित कारंडे यांच्या ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष या महत्त्वाच्या पदाबरोबरच पक्षाची कार्यालयीन प्रमुख, राज्य समन्वयक तसेच रायगड, पुणे व सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी अशा जबाबदाऱ्या दिल्या आहेत. शिवाय त्यांना जिल्हा अध्यक्षांच्या कामांचा आढावा घेऊन योग्य ते बदल करण्याचेही अधिकार दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)