कॉंग्रेसच्या आरोपामुळे राष्ट्रवादीचा बहिष्कार-प्रफुल्ल पटेल

नवी दिल्ली -गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीवरून कॉंग्रेसने केलेल्या आरोपामुळे विरोधकांच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतल्याचे त्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना मतदान करण्याबाबत राष्ट्रवादीने गुजरातमधील आपल्या दोन आमदारांसाठी तीन ओळींचा व्हिप (पक्षादेश) जारी केला. त्यानुसार राष्ट्रवादीच्या आमदारांनी मतदान केले. त्यानंतरही कॉंग्रेसच्या नेत्यांकडून पाठिंबा न दिल्याचा आरोप आमच्यावर केला जात आहे, असे प्रफुल्ल पटेल पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विरोधी ऐक्‍याचा भाग आहे का, या प्रश्‍नावर त्यांनी वेळ आल्यावर निर्णय घेऊ, असे उत्तर दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)