कॉंग्रेसचे राजस्थानातही कर्ज माफीचे आश्‍वासन 

जयपुर – छत्तीसगड मध्ये कॉंग्रेसने ज्या प्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्‍वासन दिले होते त्याच प्रमाणे त्यांनी राजस्थानातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचे आश्‍वासन दिले आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण येथील सभेत बोलताना सांगितले की राजस्थानात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर शेतकऱ्यांना दहा दिवसांत कर्जमाफी दिली जाईल.

ते म्हणाले की आम्ही पंजाब आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्‍वासन दिले होते आणि आम्ही ते पुर्णपणे पाळले आहे. मी कधीही खोटी आश्‍वासने देत नाही. मतदारांना फसवणे हा आमचा उद्योग नाही असे स्पष्ट करून ते म्हणाले की मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि आज या व्यासपीठावरून मी जे काही बोलत आहे तेही मी येथे करून दाखवणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)