कॉंग्रेसचे दिवंगत नेते मदन पाटील यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंकेतील 248 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी कॉंग्रेसचे दिवंगत नेते मदन पाटील यांच्या कुटुंबियांच्या नावावरील दहा मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वसंतदादा बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात संबंधित वारसदारांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. यात मदन पाटील यांच्या पत्नी आणि दोन मुलीच्या नांवावरील मालमत्तेचा समावेश आहे. सहकारी बॅंकिंग क्षेत्रात एकेकाळी मोठा दबदबा असणाऱ्या वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंकेतील तत्कालिन संचालक, अधिकाऱ्यांनी नियमबाह्य व विनतारण कर्जवाटप केले होते. यातील 300 कोटींहून अधिक रुपयांच्या कर्जवाटप प्रकरणावर आक्षेप नोंदविण्यात आला होता. आता याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी मालमत्ता जप्तीचे आदेश दिले असून, यात कवलापूर, पद्माळे आणि सांगलीतील दहा मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)