कॉंग्रेसची 31 ऑगस्टपासून “परिवर्तन’ यात्रा

कोल्हापूर – केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या विरोधात कॉंग्रेस पुन्हा राज्यभर रान उठविणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने येत्या 31 ऑगस्टपासून पश्‍चिम महाराष्ट्रात “परिवर्तन’ यात्रा सुरू करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होत असून या यात्रेच्या नियोजनासाठी पुण्यात कॉंग्रेस समिती कार्यालयात सोमवारी (दि. 20) आमदार, प्रदेश कॉंग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील यात्रेचे आमदार सतेज पाटील हे समन्वयक आहेत. कॉंग्रेसने यापूर्वी माणिक ठाकरे हे प्रदेशाध्यक्ष असताना “जनजागरण’ यात्रा काढली होती. त्यानंतर गेल्या वर्षी दोन्ही कॉंग्रेसच्यावतीने “संघर्ष’ यात्रा काढण्यात आली. आता कॉंग्रेसने ही “परिवर्तन’ यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस हा सक्षम पर्याय आहे व लोकांनी परिवर्तन करावे, असा जनतेला विश्वास देण्यासाठीच ही यात्रा काढण्यात येणार आहे.

कोल्हापुरातून 31 ऑगस्टला सुरू होणारी ही यात्रा सांगली, कराड, सातारा, सोलापूर करून पुण्यात सांगता होईल. ही यात्रा नऊ दिवसांची असून, रोज किमान 22 किलोमीटर जाणार आहे. प्रत्येक दिवशी तीन जाहीर सभांचे नियोजन आहे. ती प्रत्येक विधानसभा मतदार संघातून जावी, असे नियोजन करण्यात येत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील यात्रा झाल्यावर गणेशोत्सव झाल्यावर पुन्हा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ही यात्रा काढण्याचे पक्षाचे नियोजन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)