कॉंग्रेसची सामान्यांशी नाळ पुन्हा जोडण्याचे आवाहन

पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात कॉंग्रेसला मानणारा सर्व जाती-धर्मांतील वर्ग असताना केवळ सर्वसामान्यांशी नाळ तुटल्यानेच शहरात कॉंग्रेसची बिकट अवस्था झाली आहे. या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी आपल्यातील विवेक जागा करावा, असे आवाहन पक्षाचे चिंचवड ब्लॉक अध्यक्ष संदेश नवले यांनी केले आहे.

शहरात माजी खासदार नाना नवले, अशोक मोहोळ दिवंगत शालेय शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे, शंकरराव पाटील, अशोक तापकीर, या नेत्यांनी कॉंग्रेस वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा कार्यकर्त्यांशी सुसंवाद होता. तो पुढच्या नेतृत्वाने ठेवला नाही, त्यामुळे पक्षाची अवस्था वाईट झाली. 2017 च्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी झाली असती, तर पक्षाला चांगले यश मिळाले असते. आघाडी होऊ नये यामागे कोणाचा तरी हात होता, असा आरोप नवले यांनी केला आहे.

पक्षाची “व्होट बॅंक’ सांभाळता आली नाही, त्यामुळे पालिका निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळाली नाही. यास स्थानिक नेतृत्व जबाबदार आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी विवेक जागा करावा, वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन पक्षाला उभारी देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नवले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)