कॉंग्रेसची मंगळवारी सायकल रॅली

पिंपरी – केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात पेट्रोलचा प्रती लिटर दर 80 रुपयांहून जास्त झाला आहे. याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. 30) शहरात सायकल रॅली काढण्यात येणार आहे.

निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून सकाळी 10 वाजता रॅलीला सुरुवात होईल. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत ही रॅली काढण्यात येईल, अशी माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिली. कॉंग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)