कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा बुधवारी इंदापुरात

रेडा- महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे इंदापूर तालुक्‍यात बुधवारी (दि. 5 सप्टेंबर) आगमन होणार आहे. या जनसंघर्ष यात्रेची इंदापूर नगरपालिकेसमोर सकाळी 10 वाजता भव्य जाहीर सभा होणार आहे. यासभेत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, विश्‍वजित कदम आदि मान्यवर नेते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
या संघर्ष यात्रेच्या तयारीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि. 29) कार्यकर्त्यांसमवेत चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तालुका अध्यक्ष ऍड.कृष्णाजी यादव, मयूरसिंह पाटील, लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलास वाघमोडे आदिंसह पदाधिकारी, कार्येकर्ते उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, कोल्हापूर येथून शुक्रवारी (दि. 31) या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचा प्रारंभ होणार आहे. यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे व पक्षातील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सोलापूर मुक्काम संपवून बुधवारी सकाळी जनसंघर्ष यात्रा पुणे जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. इंदापूर शहरातील रामवेस येथून बुधवारी सकाळी 10 वाजता 5 हजार युवकांची दुचाकी रॅली निघणार आहे. तसेच नगरपालिके समोर होणाऱ्या सभेत तालुक्‍यातील गावोगावचे कार्यकर्ते व नागरीक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहे. दरम्यान, यात्रेसोबत मी कोल्हापूर येथून असल्यामुळे इंदापूरात आता यात्रेसमवेतच येणार आहे, त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनसंघर्ष यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी झटून जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)