कॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह 

शाजापूर: कॉंग्रेस खोटी आश्वासने देऊन मध्य प्रदेशमध्ये सत्ता हस्तगत करू पाहते आहे. आम्ही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशमध्ये निवडणूक लढवतो आहोत. परंतु कॉंग्रेसचा मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण आहे?, या लोकांकडे राज्यासाठी कोणताही नेता तर नाहीच, अन्‌ साधी नीतीही नाही, असा हल्लाबोल भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केला.

मध्य प्रदेशातल्या शाजापूरमध्ये एका जनसभेला ते संबोधित करत होते.त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. अमित शाह म्हणाले, शिवराज सरकारने शेतक-यांना मोठया प्रमाणात कर्जवाटप केले आहेत. या कर्जावरील व्याजही अत्यल्प आहे. मध्य प्रदेशातील सर्व गावांना रस्त्यांनी जोडण्याचे काम शिवराज सिंह चौहान सरकारने केले आहे. कॉंग्रेसच्या शासनकाळात धर्मांतरण आणि गोरखधंदाच सुरू होता, अशी टीकाही अमित शाह यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अमेरिकेच्या दौ-यावर गेले होते. तेव्हा ते मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेतल्या रस्त्यांसारखे असल्याचे म्हणाले होते. अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते चांगले आहेत. मी वॉशिंग्टन विमानतळावर उतरल्यानंतर कारने जो प्रवास केला, त्यातून माझ्या हे लक्षात आले, असे ते म्हणाले होते. अमेरिकेतील एखाद्या रस्त्याच्या अनुभवातून तेथील सर्वच रस्त्यांविषयी सरसकट हे विधन त्यांनी केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)