कॉंग्रेसकडून 11 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

कर्नाटक विधानसभा निवडणूक; बादामी मतदारसंघातून लढणार सिद्धरमैया

बंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठीची कॉंग्रेसने 11 उमेदवारांची अंतिम यादी रविवारी प्रसिद्ध केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या चामुंडेश्‍वरी हे बादामीसह दोन मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. राज्यभरात विधानसभा निवडणूकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे.

सिद्धरमैय्या म्हणाले की, म्हैसुरमधील चामुंडेश्‍वरी विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढविण्यास इच्छूक होतो. मात्र, पक्षाच्या स्थानीक नेत्यांनी आग्रह केल्याने मी बादामी मतदारसंघातूनही निवडणूक लढवितआहे. यामुळे उत्तर कर्नाटकमधील कॉंग्रेसला पाठबळ मिळेल, असे त्यांनी सांगितले. बादामी मतदारसंघातून उमेदवारीसाठी सिद्धरमैय्या हे 24 एप्रिल रोजी अर्ज करणार आहेत. यापूर्वी त्यांनी चामुंडेश्‍वरी येथूनही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. दरम्यान, विधानसभा  निवडणूकीसाठी शनिवारी 368 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यात माजी मंत्री बी. श्रीरामुलु यांचाही समावेश आहे. आतापर्यंत एकूण 1,144 उमदेवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)