कॉंगेस आघाडीचे उमेदवार विशाल कोतकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ : विनायक देशमुख

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नगर शहराला केले बदनाम
नगर – शहरातील विविध प्रश्न जैसे थेच असून, सत्ता केंद्रात असो व राज्यात त्याचा कुठलाही फायदा मात्र, नगरला झालेला नाही. मूलभूत सुविधांची सगळीकडेच वाणवा आहे. पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा आतापर्यंत अनेक वेळा खंडित करण्यात आला आहे. प्रश्नांची जाण नसलेले सत्ताधारी बनल्याने ही अडचण होत आहे. मनपाच्या दुरवस्था नगरकरांपासून लपून राहिलेली नाही. सत्ताधाऱ्यांनी शहराला बदनाम केले, असा घणाघाती आरोप प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांनी केले.
अ.नगर मनपा प्रभाग 32 ब पोटनिवडणुकीतील कॉंगेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विशाल कोतकर यांच्या प्रचाराचा नारळ प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. संगाम जगताप, माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, नगरसेवक सुनील कोतकर, निखिल वारे, बाळासाहेब पवार, प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक सुनील कोतकर, नगरसेविका सविता कराळे, सुनीता कांबळे, सुनील उमाप, जालिंदर कोतकर, कृष्णा लांडे, बाळासाहेब भुजबळ, बाबुराव कराळे, जयंत खाकाळ, शशिकांत आठरे, रघुनाथ लोंढे, बाळासाहेब भंडारी आदींसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
देशमुख पुढे म्हणाले, केडगावच्या विकासासाठी कोतकर कुटुंबीयांचे योगदान मोठे आहे. विकासाची गंगा त्यांनी केडगावच्या दारी आणली. त्यामुळेच येथील नागरिकांना नागरी सुविधा मिळत आहेत. विशाल कोतकर यांना विजयी करून मतदारांनी कॉंगेस आघाडीच्या कामाची पावती त्यांना द्यावी, असे सांगितले.
आ. संगाम जगताप म्हणाले, विरोधकांचे खरे रूप जनतेसमोर आले आहे. विरोधकांकडे आता कुठलाही विकासाचा ठाम मुद्दा नाही. कॉंगेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विशाल कोतकर यांना मतदारांनी प्रचंड मताधिक्‍याने निवडून द्यावे, असे सांगितले. यावेळी सुवर्णा कोतकर, प्रा. माणिक विधाते, बाळासाहेब पवार, निखिल वारे यांची भाषणे झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)