कै. सदू शिंदे करंडक क्रिकेट स्पर्धा : एस. बालन संघाची विजयी आगेकूच 

पुणे – एस. बालन संघाने दिलीप “ए’ संघाचा 5 गडी राखून पराभव करताना कै. सदू शिंदे करंडक क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. येथील नेहरू स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिलीप ए संघाने करण भोसले (23), सचिन कुलकर्णी (21) आणि ललित सोनवणे (नाबाद 36) यांच्या फलंदाजीच्या जोरावर 26.2 षटकांत सर्वबाद 140 धावांची मजल मारली. विजयासाठी 141 धावांचे आव्हान असलेल्या एस. बालन संघाने प्रत्युत्तरात फलंदाजी करताना अभिषेक सुपेकर, करण स्वामी आणि अक्षय वाघमारे यांच्या फलंदाजीच्या जोरावर 26.3 षटकांत 5 गडी बाद 143 धावा करताना चमकदार विजय मिळवला.

एस. बालनचे सलामीवीर लवकर परतल्यानंतर अभिषेक सुपेकर 36, करण स्वामी नाबाद 32 आणि अक्षय वाघमारे नाबाद 35 यांनी किल्ला लढवत संघाच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले. यावेळी दिलीप ए संघाच्या विशाल भारंबीकरने 8 धावा देत 1 गडी बाद केला तर ललित सोनवणेने 13 धावात 1 बळी मिळवला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिलीप ए च्या संघाचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत राहिल्याने त्यांना केवळ 140 धावांचीच मजल मारता आली. यावेळी एस. बालनच्या रोहित सरवदेने 14 धावांत 3 गडी बाद केले तर अक्षय वाघमारे, गौरव पारित या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत सुरेख कामगिरी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)