कैसर-ई-हिंद बुवासाहेब बर्गे व्याख्यानमाला 9 डिसेंबरपासून सुरु

कोरेगाव – कैसर-ई-हिंद बुवासाहेब बाळासाहेब बर्गे यांच्या स्मृत्यर्थ येथील डॉ. मिरदेव गायकवाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतिने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या व्याख्यानमालेस येत्या रविवार दि. 9 डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे.व्याख्यानमालेचे यंदा आठवे वर्ष असून रविवार दि. 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता युवा व्याख्याती कु. संपदा संतोष जगताप (निगडी) यांचे शिवपुत्र शंभूराजे या विषयावर, सोमवार दि. 10 डिसेंबर रोजी प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. मिलिंद शहा यांचे देण्याची कला या विषयावर तर मंगळवार दि. 11 डिसेंबर रोजी गडवाट संस्थेचे संघटक, इतिहास संशोधक अजय जाधवराव (सातारा) यांचे भोसले घराण्याचा सहा पिढ्यांचा संघर्षमय इतिहास या विषयांवरील व्याख्यान होणार आहे.

याच कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा तसेच कोरेगांव इनरव्हिल क्‍लब, उपक्रमशिल शेतकरी प्रशांत संकपाळ व राज्यस्तरीय धावपटू आरती बर्गे या सर्वांचा विशेष गौरवही करण्यात येणार आहे. येथील श्री भैरवनाथ बहुद्देशीय सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानमालेस उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. मिरदेव गायकवाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतिने करण्यात आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)