पहाटे 5 ते रात्री 12 वेळेत राहणार खुली
सातारा- बालाजी चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून संगम माहुली, सातारा येथे उभारलेल्या कैलास स्मशान भूमित आता अंत्यविधीपूर्वी मृत व्यक्तीच्या ओळखीचे कागदपत्रे व माहितीपूर्ण फॉर्म भरून देणे आवश्‍यक होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मागील 15 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या कैलास स्मशान भूमित आजपर्यंत 18 हजारांच्यापेक्षा जास्त मृतदेहांवर कोणताही देखभाल निधी न स्विकारता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याची नोंद संस्थेच्या रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे. परंतु, मृतदेहाची सविस्तर माहिती संस्थेकडे नव्हती. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होवू लागल्याने आता दि. 15 सप्टेंबरपासून अंत्यविधीपूर्वी कायदेशीर बाब म्हणून अर्धा तास अगोदर येवून फॉर्म भरणे आवश्‍यक होणार आहे. फॉर्मसोबत मृत व्यक्तीचा आयकार्ड फोटो तसेच रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन, पॅनकार्ड, पासपोर्ट यापैकी एक तसेच माहिती देणाऱ्या व्यक्तीचा एक फोटो व ओळखपत्र व संपर्कासाठी दोन मोबाईल क्रमांक देणे आवश्‍यक आहे.

तसेच 15 सप्टेंबरपासून स्मशानभूमी ही पहाटे 5 ते रात्री 12 यावेळेत खुली राहणार असून मृत्य नोंदणी फॉर्म भरण्यासाठी संस्थेच्या भवानी पेठ, सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन चोरगे यांनी केले. यावेळी संजय कदम, नितीन माने, राजेंद्र खंडेलवाल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)