के. श्रीकांत, सायना नेहवाल “ऑस्ट्रेलिया ओपन’साठी सज्ज

सिडनी, दि. 19 – इंडोनेशिया ओपनमध्ये ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचे लक्ष्य आता ऑस्ट्रेलिया ओपन सुपर सीरीज जिंकण्यावर केंद्रीत करणार आहे. ऑस्ट्रेलिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची सुरूवात उद्यापासून (मंगळवार) होणार असून 25 जून रोजी संपणार आहे. या स्पर्धेत के. श्रीकांत पुन्हा एकदा स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याच्या उद्देशाने उतरणार आहे. तसेच महिला एकलमध्ये गतविजेती सायना नेहवाल आपला किताब कायम राखण्यासाठी कोर्टवर खेळणार आहे.

इंडोनेशिया ओपनमध्ये उलटफेर करत विजेतेपद जिंकणाऱ्या के. श्रीकांतसह पुरूष एकलमध्ये एचएस प्रणय, बीसाई प्रणीत, अजय जयराम हे भारतीय खेळाडू स्पर्धेत खेळणार आहे. के. श्रीकांतने इंडोनेशिया ओपनच्या दुसऱ्या फेरीत नवव्या मानांकित डेनमार्कच्या जान ओ जॉर्गेसेन आणि सेमीफायनलमध्ये पहिल्या मानांकीत दक्षिण कोरियाच्या सोन वानचा पराभव केला होता. याशिवाय स्पर्धेत तिसऱ्या मानांकीत ली चोंग वेई आणि आठव्या मानांकित चेन लोंगचा पराभव करत उलटफेर करत सेमीफायनलमध्ये दाखल झालेला प्रणयही ऑस्ट्रेलिया ओपनचे दावेदार मानले जात आहे.

इंडोनेशिया ओपनमध्ये सायना आणि पीव्ही सिंधूची निराशाजनक कामगिरी झाली असली तरी पुन्हा एकदा दोन्ही खेळाडू या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. पुरूष दुहेरीत फ्रांसिस ऍल्विन-कोना तरूण, सात्विकसेराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी आणि मनु अत्री- सुमित रेड्डी हे भारताकडून खेळणार आहेत. तर महिला दुहेरी एन. सिक्की रेड्डी-अश्‍विनी पोनप्पा ही एकमात्र जोडी खेळणार आहे. याशिवाय मिश्र दुहेरीत सात्विकसेराज रंकीरेड्डी आणि अश्‍विनी पोनप्पा ही जोडी भारताकडून स्पर्धेत उतरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)