केस कापल्यानंतर किम कार्देशिया नर्व्हस

रिऍलिटी शो स्टार किम कार्दशियांने नुकतेच आपले केस कापून बारीक केले आहेत. पण आता ती या कापलेल्या केसांमुळे खूपच नर्व्हस झाली आहे. या बारीक केसांमुळे आपण सेक्‍सी दिसत नसल्याचे तिला वाटायला लागले आहे. आपल्या कापलेल्या छोट्या केसांमुळे लोक आपल्याबद्दल काय काय बोलू लागले आहेत, हे तिने आपल्या स्नॅपचॅट अकाऊंटमध्ये लिहीले आहे.

“मी माझ्या केसांना खूप जपत असे. मी छान दिसत असेनही कदाचित. पण सेक्‍सी दिसत नाही, हे निश्‍चित.’ असे तिने म्हटले आहे. यानंतर आपले केस पुन्हा पहिल्यासारखे वाढण्याची आपण वाट बघणार असल्याचे तिने ट्‌विटर अकाउंटमध्येही लिहीले आहे. तिच्या लांब केसांचा तिला एवढा लळा होता, तर तिने ते कापायचा निर्णय कशासाठी घेतला ? तिला कोणी काही जबरदस्ती थोडीच केली होती. किम स्वतःला लाजाळू म्हणवते मात्र सोशल मिडीयावर तिने स्वतःचे बिकीनीतले फोटो शेअर केले आहेत. विरोधाभास किममध्ये पुरेपूर आहे, हे निश्‍चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)