केसरीच्या शुटींग दरम्यान अक्षयकुमार जखमी

सातारा जिल्ह्यातील वाई येथे सुरु असलेल्या केसरी या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान ऍक्‍शन क्‍लायमॅक्‍स शूट केला जात असताना हिरो अक्षयकुमार जखमी झाला. त्याच्या बरगडी आणि कोपराला मार बसला असून डॉक्‍टरनी त्याला त्वरित मुंबईला परतून आराम करण्याचा सल्ला दिला त्यासाठी हेलिकॉप्टर तैनात केले गेले. मात्र अक्षयने वाई येथील एका घरातच आराम करून शुटींग पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असे समजते. बुधवारी त्याला अपघात झाला आणि त्या दिवसापूरते त्याला शुटिंग थांबवावे लागले.

मात्र मुंबईला परत येऊन उपचार घेण्यास अक्षयने नकार दिला. त्याला आपले शुटिंग जास्त महत्वाचे वाटल्याने त्याने तिथेच थांबून शुटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याचे क्‍लायमॅक्‍सचे शुटिंग गुरुवारी पूर्ण होणार होते. या चित्रपटाचे 80 टक्के शुटींग पूर्ण झाले असून तो 2019 च्या होळीला प्रदर्शित होणार आहे. अक्षय यात शीख योद्‌ध्याची भूमिका करत असून चित्रपटाची कथा सारागढी च्या युद्धावर बेतलेली आहे. 21 शिख योध्याच्या पराक्रमाची हि गाथा असून त्यात अक्षयकुमारची नायिका आहे परिणीती चोप्रा. दरम्यान अक्षय आता मुंबईला परत आल्याचे समजते आहे. जुहू बीचवर रविवारी सकाळी तो व्हॉलिबॉल खेळत होता, असे फोटो व्हायरल झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)