केसनंद येथे एकावर प्राणघातक हल्ला

सहा आरोपींना अटक; निवडणूक की व्यावसायीक वाद

वाघोली – केसनंद-भंडलकर वस्ती (ता. हवेली) येथील रस्त्यावर राधास्वामी कंपाउंड जवळ माजी सरपंच प्रणाली तांबे यांचे दीर सब कॉन्ट्रॅक्‍टर सागर सुखदेव तांबे (वय 28, रा. तांबे वस्ती, केसनंद) यांच्यावर मंगळवारी (दि.27) सकाळी 9:00च्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला. केसनंदच्या सरपंच पदाच्या निवडणुकीबाबत तांबे यांच्यावर दबाव आहे. त्यामुळे राजकीय वैमनस्यातून की व्यवसायीक कारणातून हल्ला करण्यात आला, याचा तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.

लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, राधास्वामी सिमाभिंतीजवळ दुचाकीवरून आलेल्या तोंडाला रुमाल बांधलेल्या चौघांनी सागर तांबे याला गाडी आडवी मारीत हॉकीस्टीकने मारहाण केली. त्यानंतर चारचाकीतून आलेल्या पाच जणांनी कोयता, चाकू मारण्यासाठी आणला होता, हे पाहताच तांबे पळू लागले. त्यावेळी शेतात काम करणारे ग्रामस्थ तांबे यांच्या मदतीसाठी धावून आले व मारेकऱ्यांना पिटाळून लावले. मारेकरी दुचाकी जागेवरच सोडून पसार झाले. पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. 28) आरोपींचा शोध घेत आरोपी शेखर गोरख सातव (रा. केसनंद), जनार्दन बाबुराव ढवळे (रा. मेमानवाडी, ता.दौंड), किसनराव शंकरराव घोडके (रा. कोरेगाव भीमा), विशाल बाळू भिसे, कुणाल अनिल देशमुख (दोघे, रा. शिवणे), महेश राजेंद्र आव्हाड (रा. आळंदी) यांना लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गिलबिले यांनी अटक केली आहे, अशी माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे ठाणे मेहबूब शेख यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)