केसनंद ग्रामपंचायत कोणत्याही चौकशीला तयार

वाघोली- माहिती अधिकार कार्यकर्ते सचिन धुमाळ यांच्या तक्रारीवरून केसनंद ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याचे पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी नुकतेच आदेश दिले आहेत. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मीनाक्षी सातव, उपसरपंच रमेश हरगुडे, हिरामण हरगुडे यांनी सांगितले की, ग्रामपंचायत कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. माहीती अधिकार कायद्यानुसार ग्रामपंचायतीकडे मागण्यात आलेली माहिती वेळोवेळी दिली आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाच्या मान्यतेने शासकीय नियमाप्रमाणे चांगल्या दर्जाची कामे केसनंद येथे चालू असून त्यात नागरिकांचा देखील चांगला सहभाग लाभला आहे. ग्रामपंचायतीकडून पारदर्शक कारभार करण्यात येत आहे, त्यामुळे कोणत्याही चौकशीला आम्ही तयार असल्याचे केसनंदच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)