केसनंदमध्ये एकाला धारदार शस्त्राने मारहाण

पाच जणांवर गुन्हा दाखल; एक अटक इतर फरार

वाघोली- केसनंद (ता. हवेली) येथील गणेश पार्क येथील रहिवाशी अमित अशोक भंडलकर (वय 27) व राजेंद्र गंगाधर लिंगसे यांना लाथाबुक्‍क्‍यांनी व टोकदार हत्याराने मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर लोणीकंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी हरगुडे (रा. तळेरानवाडी, केसनंद) महेश गाडुते (रा. बकोरी), किरण बबन हरगुडे, ओंकार नवनाथ हरगुडे (रा. तळेरानवाडी, केसनंद) व एक अनोळखी, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. तर तिघे फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित भंडलकर यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या भाडेकरूच्या मुलीला मोबाईल नंबर मागणाऱ्या मुलाला जाब विचारला. याचा राग मनात धरून मित्राला बोलावून लाथाबुक्‍याने मारहाण केली. भंडलकर यांना मारहाण होत असल्यामुळे राजेंद्र लिंगसे सोडवण्यासाठी आले असता त्यांना सुद्धा हत्याराने मारहाण केली. ही घटना दि. 9 जानेवारी रोजी सायंकाळी पाऊणे आठच्या सुमारास घडली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब टापरे करीत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)