केशव गोयल, अनमोल नागपुरे, रिधी पोका, श्रावणी खवले यांची विजयी सलामी

एमएसएलटीए-योनेक्‍स्‌ सनराईज्‌ 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा 
पुणे, दि. 27 – एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्‍स्‌ सनराईज्‌ 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत केशव गोयल, सार्थक पोतदार, आर्यन सुतार, अधिरीत अवल, अनमोल नागपुरे, रिधी पोका, श्रीवल्ली मेदीशेट्टी, तनिष्का पतर, श्रावणी खवले व अनुष्का सिन्हाया खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस्‌ कॉम्पलेक्‍स्‌ येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात केशव गोयलने विर प्रसादचा 9-8(4) असा टायब्रेकमध्ये पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. आर्यन सुतारने अहान देखवीलचा 9-2 असा तर अधिरीत अवलने हेमांग कवडचा 9-1 असा सहज पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. तर, मुलींच्या गटात श्रीवल्ली मेदीशेट्टीने मोनिषा देवाराकोंडाचा 9-0 असा, तनिष्का पतरने श्रावणी वैद्यचा 9-1 असा तर श्रावणी खवलेने तेजस्विनी शिरफुलेचा 9-0 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सविस्तर निकाल : पहिली पात्रता फेरी : मुले – केशव गोयल वि.वि विर प्रसाद 9-8(4), सार्थक पोतदार वि.वि अरित्रो घोष 9-4, आर्यन सुतार वि.वि अहान देखवील 9-2, अधिरीत अवल वि.वि हेमांग कवड 9-1, अनमोल नागपुरे वि.वि आरुष शर्मा 9-6,
मुली – रिधी पोका वि.वि अलिशा देवगावकर 9-4, श्रीवल्ली मेदीशेट्टी वि.वि मोनिषा देवाराकोंडा 9-0, तनिष्का पतर वि.वि श्रावणी वैद्य 9-1,
श्रावणी खवले वि.वि तेजस्विनी शिरफुले 9-0, अनुष्का सिन्हा वि.वि मृणमयी जोशी 9-2.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)