केशवनगरमध्ये “तिरंगा एकता संमेलन’

– माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिकांचा गौरव

चिंचवड – काकडे पार्क मित्र मंडळ व आम्ही चिंचवडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने केशवनगर, काकडे पार्क चौक येथे 69 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त तिरंगा एकता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

-Ads-

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक मधू जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक समरसता मंचाचे प्रांत कार्यवाह पंजाबराव मोंढे, नगरसेवक ऍड. मोरेश्वर शेडगे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, महाराष्ट्र वीज महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे, काकडे पार्क मित्र मंडळाचे नयन पालांडे यांनी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले.

मधू जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मधुकर बच्चे यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले. तर नगरसेवक ऍड. शेडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनसंदेश वाचून दाखवला. याप्रसंगी परिसरातील माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, कलावंत व साहित्यिक आदींना सन्मानित करण्यात आले. नयन पालांडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)