…केवळ लीड रोलच करणार – प्रियांका

प्रियांका चोप्रा गेल्या दिड दशकामध्ये हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप चांगले नाव कमावले आहे. एवढेच नव्हे तर तिने ग्लोबल स्टार म्हणून ओळखही निर्माण केली आहे. आता हिंदी चित्रपटांमध्ये केवळ नायिका किंवा लीड रोल असेल, तरच काम करणार असे प्रियांकाने ठरवून टाकले आहे. दिल्लीत फिक्कीने आयोजित वार्तालापाच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना तिने आपली भूमिका स्पष्ट केली.

“बेवॉच’ आणि “क्‍वांटिगो’मुळे अमेरिकेत लोकप्रिय झालेल्या प्रियांकाला आता आलतू फालतू रोल करण्याची आवश्‍यकताही नाही. या रोलमुळेच भारतातील आणि दक्षिण आशियातील कलाकारांना अमेरिकेतील मुख्य प्रवाहातील इन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये शिरकाव करायची संधी मिळू शकेल, असे ती म्हणाली.

-Ads-

हॉलिवूडमध्ये तिने जे रोल केले आहेत, त्याचा तिच्या वांशिकतेशी काहीही संबंध नाही. त्यामुळे तिला अजूनही हॉलिवूडमध्ये चांगले रोल मिळू शकत आहेत. मग साईड रोल कशाला करायचे ? याबाबत काहीही तडजोड करायची तिची ईच्छा नाही. तिने अलिकडेच सलमान खानबरोबरचा “भारत’ सोडल्यामुळे सलमान तिच्यावर नाराज आहे. तिने ख्रिस पॅटबरोबरचा “काऊबॉय निंजा विकिंग’ साईन केला आहे. मात्र तो बेमुदत काळासाठी पुढे ढकलला गेल्याचे समजते आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)