केवळ निवडणुकीसाठी अपुर्ण महामार्गाचे उद्‌घाटन : कॉंग्रेस

मोदी सरकारच्या घिसाडघाईने अनेकांचे जीव धोक्‍यात

नवी दिल्ली: हरियाणात बांधण्यात येत आलेल्या कुंडली-मनेसर-पलवाल हा बहुचर्चित राष्ट्रीय महामार्ग अजून अपुर्ण अवस्थेत आहे. तरीही त्याच्या उद्‌घाटनाचा घाट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या अपुर्ण कामांमुळे वाहनचालकांचे जीव धोक्‍यात येणार आहेत. आधी सरकारने हा रस्ता पुर्ण करावा आणि मगच त्याचे उदघाटन करावे असे कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की या रस्त्याच्या कामाची अभियंत्यांकडून चाचणी करण्यात आलेली नाही. संबंधीत यंत्रणांनी या रस्त्याला पुर्णत्वाचा दाखला देण्यास नकार दिला आहे. एचएसआयआयडीसीने या रस्त्यावर काही अपघात घडल्यास त्याची आपण जबाबदारी घेणार नाही असे म्हटले आहे. असे असताना त्या रस्त्याच्या उद्‌घाटनाची घिसाडघाई केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन केली जात आहे असेही त्यांनी म्हटले आहे. रस्ता पुर्ण होण्याच्या आतच तेथे वाहतुकीला परवानगी देऊन खासगी विकासकाला दररोज 26 कोटी रूपये मिळवून देण्याचाही घाट सरकारकडून घातला जात आहे असो आरोप त्यांनी केला.

एकूण हा रस्ता 135 किमीचा आहे. तो आज पंतप्रधान आणि हरियानाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला करण्यात आला. त्या रस्त्यावर एकूण 14 लहान मोठे पुल आहेत. तसेच या महामार्गावर एकूण 7 टोल नाके आहेत. खासगी गुंतवणुकीतून हा रस्ता उभारण्यात आला आहे. त्या रस्त्यामुळे दिल्लीतील वाहतूक अन्यत्र वळवली जाणार असल्याने दिल्लीतल्या वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचा सरकारचा दावा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)