केवळ निवडणुका आल्या म्हणून त्यांना राम मंदिर आठवले : मायावती 

नवी दिल्ली: केवळ लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून त्यांना पुन्हा राम मंदिर आठवले आहे. आपले अपयश झाकण्यासाठी त्यांनी काढलेली ही पळवाट आहे अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी भाजप आणि शिवसेनेवर केली आहे. हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याने त्याविषयाचा निकाल होईपर्यंत या पक्षांनी वाट पाहिली पाहिजे. त्याच्या आधीच या लोकांनी यावरून वातावरण बिघडवण्याचे काम करू नये असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारला सर्वच क्षेत्रात अपयश आले आहे हे लपवण्यासाठीच त्यांनी मंदिराचा विषय हातात घेतला आहे त्यांना लोकांचे लक्ष विचलीत करायचे आहे असे त्यांनी आज पत्रकार परिषदेत नमूद केले. राम मंदिराच्या नावाने कार्यरत झालेल्या संघटना केवळ समाजात दुफळी माजवण्याचे काम करीत असून त्यांच्या या आंदोलनामुळे समाजात पुन्हा हिंसाचार माजेल ही बाब त्यांनी लक्षात घ्यायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)