केवळ दहा हजार रुपयासाठी साईबाबा रुग्णालयात तब्बल ९ तास मृतदेहाची हेळसांड

रुग्णांच्या नातेवाईकांना राहाता शहरात हातपसरण्याची वेळ
शिर्डी – दोन हजार कोटी पेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या साईबाबा संस्थानच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयाचे दान भाविक साईचरणी टाकत असताना दुसरीकडे मात्र साईबाबा सुपर रुग्णालयात केवळ १० हजार रुपयासाठी एक दोन नव्हे तर तब्बल ९ तास मृतदेहाची अवहेलना करण्यात आली. मृतदेह ताब्यात मिळत नसल्याने अखेर नातेवाईकांनी राहाता शहरात जाऊन पै पै गोळा करुन दहा हजार रुपये जमा करुन मृतदेहाची सुटका करुन घेतली. या संतापजनक प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांत रुग्णालय प्रशासनाविरुद्ध प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पुणे येथील छाया संतोष पारखे (वय ४५) ही महिला राहाता येथे पाडव्याच्या सणानिमित्त आपल्या नातेवाईकांना भेट देण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान त्यांना ब्रेन ट्युमरचा त्रास होत असल्याने संस्थानच्या साईबाबा सुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याठिकाणी त्यांच्यावर दहा दिवस उपचार करण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचे बुधवारी (२८ मार्च रोजी) सकाळी निधन झाले. सदर रुग्णाचे हाँस्पीटलचे बील सुमारे एक लाखाच्या जवळपास झाले होते. यापैकी साईबाबा संस्थानच्या रुग्णालय प्रशासनाने जवळपास ८० हजार रुपये माफ केले, उर्वरीत दहा हजार रुपये भरल्या शिवाय मृतदेह ताब्यात दिला जाणार नसल्याचे रुग्णालयाच्या वतीने नातेवाईकांना सांगण्यात आले.

एवढी मोठी रक्कम माफ केले मात्र केवळ दहा हजार रुपयासाठी मृतदेह देत नसल्याने नातेवाईकांनी वारंवार विनंती केली.  मात्र रुग्णालय प्रशासनाने मात्र स्पष्ट नकार दिला. अखेर नाराज झालेले नातेवाईकांनी राहाता येथे जाऊन दहा हजार रुपये जमा करण्यासाठी प्रयत्न केले. परिस्थीती गरीबीची असल्याने नातेवाईक सदर रक्कम भरु शकत नव्हते. पैसे नसल्याने हताश झालेले नातेवाईकांना हात पसरण्याची वेळ आली. पै पै जमा करुन अखेर दहा हजार रुपये जमा केले. पैसे भरल्यानंतरच साईबाबा रुग्णालयातुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पैशा अभावी पुणे येथे जाऊ न शकल्याने सदर मृतदेहावर राहाता येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. साईबाबा संस्थानकडे मोठी गंगाजळी भक्तांच्या दानातुन जमा होत असताना केवळ दहा हजार रुपयासाठी तब्बल नऊ तास मृतदेहाची अवहेलना करण्यात आली. साईबाबांनी आपल्या हयातीत रुग्णसेवा करुन गरीबांना मदत केली मात्र साईबाबांच्या शिकवणीला हरताळ फासण्याचे काम रुग्णालय प्रशासनाने केल्याने नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)