केवळ चार जागांचा निर्णय बाकी – अजित पवार

कोल्हापूर – लोकसभेच्या 48 पैकी 44 जागांचा निर्णय पक्का झाला असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जालना आणि औरंगाबाद या चार जागांचा निर्णय बाकी असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद दिली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तनाचा या यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातून उत्साहात सुरुवात झाली आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल मुधाळ आणि कोल्हापूर शहर या ठिकाणी जाहीर सभा झाल्या आहेत. यावेळी आयोजित कोल्हापुरात पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका मांडताना त्यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचा लोकसभेचा निर्णय झाला असल्याचे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेना आणि भाजपची युती होणारच आहे. प्रभू रामचंद्र यांच्या नावावर किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला 100 कोटी दिले म्हणून किंवा राज्याच्या आणि देशाच्या हिताचा मुद्दा पुढे करून सेना-भाजप युती करणार आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारचा अनुभव वाईट आहे त्यासाठी सरकारला हद्दपार करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एक जुटीने लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांनी वंचितांची आघाडी केली आहे. आंबेडकर यांनी आम्हाला 12 जागा मागितल्या असून त्या जागांबाबत राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आणि कॉंग्रेस उपाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा करत आहेत आणि लवकरच त्या चर्चेतून मार्ग निघेल. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी वंचितांची आघाडी निर्माण केली असली तरी त्यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे असे पवार म्हणाले. मित्रपक्षांनी जागांची मागणी जास्त असल्यामुळे जागावाटपाला थोडा वेळ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कॉंग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमताने लोकसभेचा उमेदवार निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी यापूर्वी देखील पवार साहेबांनी या कार्यकर्त्यांचा मनोमिलन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)