केवळ एक स्त्री म्हणून?

“मुलगी शिकली प्रगती झाली.’ हे वाक्‍य तर कित्येक वेळा चेष्टेमध्ये घेतलं जातं. हल्ली वाढलेले घटस्फोट याला तर केवळ स्त्रिया शिकल्या आहेत आणि त्यांच्या अपेक्षा जास्त आहेत. हेच कारण मानलं जातं. खरंच हे कारण आहे घटस्फोटांचं? बायको हुशार हवी, सुंदर हवी, कमावणारी हवी, घरी सगळी काम करणारी, मुलांना सांभाळणारी हवी. इतक्‍या सगळ्या अपेक्षा केवळ ती एक स्त्री आहे म्हणून? आज स्त्रिया आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रांमध्ये. मग कधी पुरुषांनी घरातली कामं केली तर काय कमीपणा त्यात? आपल्या मुलांनी सुनेला काही मदत केली कामात तर तो लगेच “बायकोचा बैल का?

बायका जर शिकून इतकी प्रगती करत आहेत तर पुरुषांनी समजून घ्यायला आणि आपले विचार थोडे प्रगल्भ करून जसं ऑफीसमधल्या सहकारी स्त्रिला सहाय्य करता तसेच बायकोला घरी थोडं सहाय्य करायला काय हरकत आहे? त्यांना थोडा मान दिला space दिली आणि एक स्त्री असायच्या आधीही ती human being आहे, याचा विचार केला तर घटस्फोटाचं प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

-Ads-

प्रिशाच्या आईचंही हेच झालं single mother बनून आज वाढवते आहे प्रिशाला. पण यातून नकळत मुलांच्या मनावर खूप गंभीर परिणाम होतात. family ही व्याख्याच बदलते आहे. त्यांच्या दृष्टीने एकत्र कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली आणि आताही विभक्त मधलीही विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात येऊ लागली आहे. आणि याचाही दोष केवळ बायकोलाच? का? तर ती एक स्त्री आहे म्हणून?

“प्रिशा स्वाती जोशी’ पेपर तपासत असताना नाव वाचून क्षणभर गोंधळले. वर्गातल्या सगळ्या मुला-मुलींची नावं तोंडपाठ आहेत. प्रिशा अमित केळकरची प्रिशा स्वाती जोशी कधी अन्‌ कशी झाली? मनात विचारचक्र फिरायला लागली. तिच्या आईला अर्थात स्वाती जोशींना भेटून काय प्रकार आहे. ते जाणून घ्यावा. या विचारातच पेपर तपासून पूर्ण केले आणि “उद्या आईला शाळेत येऊन भेटायला सांग असा निरोप प्रिशाजवळ दिला.

स्वाती जोशी काय सांगतील, काय समस्या असेल असा विचार सुरू असतानाच आजूबाजूच्या काही गोष्टी ज्यांचा फारसा कधीच विचार केला नव्हता, त्याही आठवू लागल्या. नवीनच शेजारी राहायला आलेलं जोडपं अगदी राजा-राणीचा असा त्यांचा संसार! एकत्र काम करत एकमेकांच्या प्रेमात कधी पडले कळालेच नाही. मग लग्न अनं संसाराची सुरुवात. नव्याचे नऊ दिवस म्हणतात. तसं सुरुवातीला सगळं खूप छानन. पण हळूहळू एकेक प्रश्‍न समोर यायला लागले. दोघांचं एकच ऑफीस एकसारख्या वेळा, एकसारखं काम. पण तरीही घरी आल्यावर तिनेच सगळी कामं करायला पाहिजेत ही अपेक्षा का? ती एक स्त्री आहे म्हणून?

माधुरी हुशार, सुंदर! ऑफिसमध्ये खूप मोठ्या पदावर. घरी सासू-सासरे, नवरा, दीर-जाऊ सगळे. पण ऑफिसमध्ये बदलीमुळे दुसऱ्या गावी काही महिने जावं लागणार होतं. त्यामुळे जॉब सोडावा लागला का? तर ती एक स्त्री आहे म्हणून?
कितीतरी वेळा हे आपण पाहतो. अनुभवतो की कित्येक ठिकाणी आपल्याला adjust करून घ्यावं लागतं.

– अमृता सुदामे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)