केळगाव शाळेत महापुरुषांना अभिवादन

चिंबळी- केळगाव (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथिनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे शिपाई निलेश गायकवाड यांनी अण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा शाळेस भेट दिली. दरम्यान, इयत्ता सातवीच्या वर्गातील मुलांचे बालसभेचे आयोजन करण्यात आले. बालसभा अध्यक्षपदी तनुजा कसबे तर अनुमोदन लौकिक काकरे याने केले. वैभवी मुंगसे, सार्थक सपकाळ, आदेश कुडकेकर, पृथ्वीराज मस्के, दुर्गा सुरवसे, वैष्णवी गायकवाड, श्रुती वारे, पांडुरंग कसबे आदी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. पाबळ केंद्राचे केंद्र प्रमुख आणि ग्रामस्थ गणेश गायकवाड यांनी मुलांना खाऊचे वाटप केले. याप्रसंगी उषा मुंगसे तसेच मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन कुमारी सिद्धि विरकर तर तर दीक्षा कुंभार हिने आभार मानले. त्याचप्रमाणे कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, माजगाव, मरकळ परिसरात सर्व जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा वतीने बालसभा आयोजित करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)