डॉ. आंबेडकर यांच्या आचार-विचारांची केली देवाण-घेवाण
चिंबळी – केळगाव (ता. खेड) येथे “एक गाव एक जयंती उत्सव’ आणि डी.जे. विरहीत जयंती तसेच मिरवणुकीत कुठेही दंगा, हुल्लडबाजी न करता सर्व गाव एकत्र भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार-विचारांची देवाण घेवाण करून केळगावमध्ये जयंती उत्सव वेगळ्या उपक्रमाद्वारे राबवून इतरांपुढे आदर्श उभा केला आहे.
केळगाव (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात आज (शनिवारी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. दरम्यान, डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सोनाली मुंगसे, उपसरपंच मनोज मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य गणेश सोनवणे, संतोष गुंड, विठाबाई गुंड, कल्पना वहिले, बनेश ठाकर, नामदेव मुंगसे, शारदा मुंगसे, ज्योती वहिले, रेश्मा मुंगसे, शाळा कमेटीचे अध्यक्ष संदिप गुंड, उपाध्यक्षा शिल्पा भांडवलकर, सोमनाथ मुंगसे, पांडुरंग मुंगसे, मिलिंद मुगसे, अमोल विरकर, सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते सुदाम गुंड, तानाजी भांडवलकर, दत्तात्रय मुंगसे, संतोष सोनवणे, गावचे पोलीस पाटील युवराज वहिले, युवा कार्येकर्ते राजू सुर्वे, तेजस विरकर, सागर सोनवणे, नितेश सोनवणे, विवेक सोनवणे, ग्रामसेविका म्हेत्रे आदि उपस्थित होते. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने 14व्या वित्त आयोगातून तसेच 15 टक्के निधीतून शाळेसाठी क्रीडा साहित्य, समाज मंदिरासाठी साऊंड सिटीम तसेच आदिवासी ठाकर बांधवांसाठी वाद्य साहित्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक विनोद चव्हाण, तर गणेश सोनवणे यांनी आभार मानले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा