केळगाव येथील फ्युइज पेटीची दुर्दक्षा

चिंबळी- खेड तालुक्‍यातील श्रीक्षेत्र आंळदी जवळ असलेल्या केळगाव येथील विजेच्या ट्रान्सफार्मरला बसविण्यात असलेल्या फ्युइज पेटीला हिरवेगार गवताने वेढले आहे. गेल्या महिन्यात पंधरा ते वीस दिवस पडलेल्या रिमझिम पावसाने आळंदी रत्सावर असलेल्या केळगाव येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या विज वितरण कंपनीने उभारण्यात आलेल्या ट्रान्सफार्मरला चार ही बाजूने गवत व झाडा-झुडपाने वेढले आहे. त्यामुळे फ्युइज पेटीची दुर्दशा झाली असून याकडे महावितरण कंपनीचे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. या ट्रान्सफार्मरला असलेल्या फ्युइज पेटीला दरवाजा नसल्याने कधीही मोठी दुर्घटना होउ शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)