केळगाव उपकेंद्रात हजार बालकांचे लसीकरण

चिंबळी – शेलपिपंळगाव (ता.खेड) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत केळगाव येथील उपकेंद्रात 1000 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. या पल्स पोलिओ लसणीकरणाचा शुभारंभ सरपंच सोनाली मुंगसे, उपसंरपच मनोज मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य संतोष गुंड, सदस्या कल्पना वहिले आदि मान्यवरांच्या हस्ते बालकांना डोस देऊन करण्यात आला. हनुमानवाडी, ठाकरवस्ती,चऱ्होली खुर्द या ठिकाणी लसीकरणाचे बुथ लावण्यात आले होते. या बुधमध्ये सुमारे एक हजार बालकांन डोस देण्यात आल्याचे आरोग्य सेविका व्ही. एस. कोकरे यांनी सांगितले. याप्रसंगी शेलपिपंळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. आर. आढाव, इंदिरा पारखे, अमित शेखरे, आशा वरकर, उषा मुंगसे. मयुरी जरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)