केळगाव आरोग्य केंद्राला इमारतच नाही सुनिल बटवाल

चिंबळी – केळगावची लोकसंख्या एकूण सात हजारावर असूनही येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वत:ची इमारत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील असलेल्या शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अतंर्गत असलेल्या केळगाव येथील प्राथमिक उपकेंद्राच्या आरोग्य केंद्रात गरोदर माता तपासणी, बालकांचे लसीकरण ओ. पी. डी. सेवा मिळत होती; परंतु आरोग्य खात्याच्या वतीने इमारत नसल्यामुळे सेवा मिळत नसल्याने येथील रुग्णांची हेळसांड होत आहे. दरम्यान, पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या एका खोलीत गरोदर माता व बालके यांना चागंल्या प्रकारची सेवा देण्यासाठी तसेच या आरोग्य केंद्रातील अधिकारी वाडीवस्तीवर जाऊन लसीकरणाचे काम चोखपणे बजावत आहेत. मात्र, इतर दर्जेदार सेवा देण्यासाठी एका चागंल्या इमारतीची आवश्‍यकता आहे व ती ग्रामपंचायतीचे द्यावी, अशी मागणी आहे.
सध्या या उपकेंद्रात प्रसुती टेबल साहित्य आहे, पण इमारत व्यवस्थित नसल्यामुळे प्रसुती तसेच पाण्याची व शौचालयाची सोय नाही, त्यामुळे प्रसुती होत नाही मागच्या वर्षी ग्रामपंचायतीने वीज तसेच प्रसुती टेबल साहित्य, साधा टेबल, वॉशिग मशीन, बि. पी. मशिन, व्हिल चेअर आदी साहित्य दिले आहे. तर आरसीएच काम ऑनलाईन असल्यामूळे ग्रामपंचायतीने एक लॅपटॉप द्यावा, अशी मागणी उपकेंद्राच्यावतीने करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य सेविका व्ही. जी. ताजणे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)