केळगावात कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले

रघुनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त भिडले 150 मल्ल

चिंबळी- केळगाव (ता. खेड) येथे गुरूवारी (दि. 28) व शुक्रवारी (दि. 29) विविध धार्मिक कार्यक्रमाद्वारे रघुनाथ महाराजांचा उत्साह उत्साहात साजरा करण्यात आला. तर शुक्रवारी रंगलेल्या कुस्ती आखाड्यातील कुस्त्यांनी कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले. यात 150 मल्लांनी सहभाग घेतला होता.
यानिमित्त मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर सकाळी आठ ते दहा हार-तुरे व श्रींची महापूजा पार पडली. रात्री आठ ते दहा पालखी मिरवणूक (छबीना) ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली होती.

यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तर दहानंतर करमणुकीसाठी कै. तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा ठेवण्यात आला होता. तर शुक्रवारी (दि. 29) सकाळी नऊ ते एक तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर दुपारी चार ते सात कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला. तर रात्री दहानंतर ऑर्केस्ट्रॉ ठेवण्यात आला होता. या आखाड्यात मरकळ, सोळू, धानोरे, मोशी, चऱ्होली, मोशी, भोसरी, दापोडी, पुणे, चिंबळी, मोई, निघोजे, डुडुळगाव, कुरुळी, चाकण, भोसरी परिसरातील मल्ल सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येक मल्ल व उपस्थित मान्यवरांना संघर्ष युवा प्रतिष्ठानच्यावतीने सन्मानचिन्ह देण्यात आले.

याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष अमोल विरकर, उपाध्यक्ष वासुदेव मुंगसे, संतोष सोनवणे, हरिष मुंगसे, विजय विरकर, पोलीस पाटील युवराज वाहिले, पांडुरंग मुंगसे, संदिप गुंड, सोमनाथ मुंगसे, शिवाजी मुंगसे, बबनराव मुंगसे, तानाजी भांडवलकर, मनोज मुंगसे आदि मान्यवर उपस्थित होते. आळंदी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस हवालदार पृथ्वीराज पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)