केळगावात एरोमॉडेलिंगच्या चित्तथराक कसरती

आळंदी- साधारणपेण मोठ्या शहरांमध्ये एरोमॉडेलिंग शो चे स्पेशल स्टंट पहावयास मिळतात; परंतु आळंदी स्थित हनुमंतवाडी, केळगाव (ता. खेड) येथील गुरुकुलात आयोजित एरोमॉडेलिंग शोमध्ये छोट्या हवाई जहाज (एरोमॉडेल्स) च्या कसरती पहावयास मिळाले. येथे 2 फूटाचे छोटे एरोमॉडेल्सपासून 10 फूटाचे एरोमॉडेल्सने चित्तथराक कसरती सादर केले. या शोची विशेषता ही होती की येथे 30 सीसी पासून 150 सीसी पर्यंतचे एरोमॉडेल्सचा सहभाग झाला होता. त्यामध्ये जेट हवाई जहाज पासून कित्येक मॉडेल्सचे हवाई जहाजाचे चित्तथराक कसरती पहावयास मिळाले. हे सर्व हवाई जहाज रेडिओ कंट्रोलच्या माध्यमातून उडविण्यात आले.
विश्‍वशांती गुरुकुलातर्फे हनुमंतवाडी, केळगाव, आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या “एरोमॉडेलिंग शो’द्वारे चित्तथराक कसरतींनी उपस्थितींच्या डोळ्यांचे पारणे फिटले. याप्रसंगी एरोमॉडेलर सदानंद काळे, एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, आळंदी येथील गुरुकुलाचे प्राचार्य अशोक जैन, विश्‍वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती राहुल कराड, उद्योगपती हरीभाई शाह, मनोज वाडेकर, दिलीप दलाल व उर्मिला कराड हे उपस्थित होते.
दरम्यान, विश्‍वशांती गुरुकुलाचा लोगो बरोबर घेवून दहा फुटी टेलीमास्टर’ विमानाने आकाशात उंच झेप घेऊन हवाई पुष्पवृष्टी केली. एरियल फोटोग्राफीसाठी सुद्धा हे विमान वापरले जाते. आपल्या देशाच्या संरक्षण क्षेत्रात प्रगत फायटर प्लेन म्हणून ओळख असलेल्या सुखोई’ व तेजस’ या विमानांच्या प्रतिकृती असलेल्या विमानांनी उड्डान घेत केलेल्या विविध प्रकारच्या कसरती अक्षय काळे व अथर्व काळे या बंधूंनी सादर केल्या. फ्लाईंग ईगल’,एनफोर्सर फ्लाईंग ईगल’,थ्रीडी’इ. विमानांनी चित्तथरारक कसरती सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या शो प्रसंगी विविध प्रकारच्या विमानांनी केलेल्या कसरती विद्यार्थी व नागरिकांसाठी पर्वणीच ठरल्या.
एरोमॉडेलर सदानंद काळे यांनी एरोमॉडेलिंग शोचे धावते समालोचन केले. या शोमध्ये अक्षय काळे व अथर्व काळे, रवीकिरण घैसास व यश जहागिरदार यांनी सर्व एरोमॉडेल्स रिमोट कंट्रोलने उडविली. येथे शालेय व महाविद्यालयीान विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध क्षेत्रातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

  • दोन पंख्यांच्या प्लेनच्या कसरतींना दाद
    एरोमॉडेलिंग शो प्रसंगी विविध प्रकारची विमाने व हेलिकॉप्टर्सनी उड्डाण करून अनेक कसरती सादर केल्या. “स्वस्तिक’नावाच्या ग्लायडर ने आकाशात प्रथम झेप घेतली. बलसा लाकडापासून तयार केलेले “जेनी’ विमान व दोन पंखांचे “बायप्लेन’, “स्टींगरे’ या विमानाने केलेल्या व्हर्टिकल रोलमध्ये एअरफोर्स सारख्या कसरतीला प्रेक्षकांनी उदंड दाद दिली. थर्माकोलपासून विकसित केलेली “उडती तबकडी’ आकाशात झेपावली. तर “हेलिकॉप्टर’ने अनेक पलट्या व कोलांट्या उड्या घेवून आकाशात बहारदार सादरीकरण केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)