केळगावच्या विद्यार्थ्यांनी बनविल्या टाकाऊपासून टीकाऊ वस्तू

चिंबळी- केळगाव (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी समर कॅम्पसमध्ये तयार केलेल्या टाकाऊ वस्तूंनपासून बनविलेल्या टिकाऊ वस्तूंची पाहणी मुंबई माता बालसंगोपन संस्था व रोटरी क्‍लब माहिम (मुंबई) च्या सदस्यांनी केली. यावेळी या दोघांच्या संयुक्‍त विद्यामाने देण्यात आलेल्या ई-लर्निंग संच व सोलर इलेक्‍ट्रॉनिक संचांचा अर्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी रोटरी क्‍लब माहिम येथील क्‍लब प्रमुख वंदना राजहंस, अभीषेक शहा, प्रतिभा मालवी, डायरेक्‍टर के. सूर्यकुमार, हरिशचंदा दंड, सुप्रिया सापळे, उषा शेषाण, सुनिता पडवळ, मुंबई माता बाल संगोपनचे सर्वेसर्वा अनंत पाटील, मानद सचिव साठे, स्वाती शिंदे, अशोक मांजरे तसेच मरकळ केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश कातोरे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, रोटरी क्‍लब, माहिम (मुंबई) च्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक यंत्र व ग्रंथालयासाठी इंग्रजी गोष्टींची पुस्तके भेट देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)