केली होपन यांच्या शैलीतील ‘यू’ विलास गृहप्रकल्प

पुणे- पंचशील रिऍल्टीतर्फे “यू’ विलास प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात आले. डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी फॅशन शोच्या माध्यमातून हा सोहळा दिखामदार बनविला. पंचशील रिऍल्टीचे अध्यक्ष अतुल चोरडिया, “यू’ चे संस्थापक जॉन हिचकॉक्‍स यावेळी उपस्थित होते.

जॉन हिचकॉक्‍स आणि प्रसिद्ध फ्रेंच डिझायनर फिलीप स्टार्क यांची अभिनव संकल्पना असलेली “यू’ डिझाईन कंपनी, पंचशीलबरोबर एकत्र आली आहे. त्याद्वारे गुणवत्तापूर्ण जीवनाची आवड असणाऱ्यांसाठी कलेचा उत्तम नमुना असणारी घरे उभारण्यात येणार आहेत. यू द्वारे सध्या 36 देशांतील 55 शहरांत 87 प्रकल्प सुरू आहेत.

“यू’ विलासमध्ये नदी किनाऱ्यावरील नयनरम्य देखाव्यासह 45 भव्य रेसिडेन्सी वाघोलीमध्ये उभारण्यात आल्या आहेत. पूर्णपणे सुरक्षित असलेल्या या बांधणीमध्ये भव्य रस्ते, झाडांच्या सावलीतून जाणारे पादचारी मार्ग आणि विहरण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मधल्या भागात सुंदर कारंजे आणि परिसरातील जलप्रवाह तसेच संपूर्ण प्रकल्पामध्ये जॉगिंग ट्रॅक्‍स, पादचारी मार्ग, हिरवळ आणि पाण्यातून साकारलेल्या सौंदर्यपूर्ण सजावटी आहेत. सर्व वयोगटातील प्रत्येकाला त्याचा आनंद घेता येणार आहे, तसेच त्यामुळे त्याला विविध उपक्रमात सहभागी होता येणार आहे.

“यू’ विलास हे केली होपनच्या तीन आश्‍चर्यकारक इंटेरिअर शैलीत सादर करण्यात आले आहे – अर्बन, सी ब्रिझ आणि व्हिंटेज. केली होपन हिने अभिरूचीपूर्ण इंटेरिअर डिझाईन्स जगभरातील विविध देशांत सादर केली असून डिझाईन इंडस्ट्रीतील योगदानाबद्दल तिला ब्रिटनच्या राणीकडून सन्मान मिळाला आहे. “यू’ विलासमधील रहिवाशांना अशाप्रकारे, पंचशील क्‍लबच्या माध्यमातून केली होपनची शैली अनुभवायला मिळणार आहे.

यामध्ये जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा, जलतरण तलाव, लॉंग, रेस्टॉरंट, बहुपयोगी प्रसंगांसाठी पुरेशी जागा, मुलांसाठी स्वतंत्र एरिया, फिटनेस सेंटर, योगा रूम आणि अन्य सेवा मिळणार आहेत. दळणवळणाच्या दृष्टीने सोपे आणि वेगाने वाढणाऱ्या परिसराच्या मध्यावर असणारे वाघोली हे ठिकाण अनेक महत्त्वाच्या लॅंडमार्क आणि सोयी-साधनांनी वेढलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)