थिरूवनंतपुरम – केरळातील मार्क्‍सवादी सरकारने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या मंत्र्यांना विदेशात पाठवून तेथील अनिवासी भारतीयांकडून मदत गोळा करण्याची सूचना केली आहे. सरकारच्या या योजनेला कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे.

राज्य सरकारने विदेशात जाऊन ही मदतीची भीक मागून केरळचा अवमान करू नये असे कॉंग्रेसचे नेते के. व्ही. थॉमस यांनी म्हटले आहे. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष एम. एम. हसन आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री ओमान चंडी यांनीही मुख्यमंत्र्यांना ही योजना रद्द करण्याची सूचना केली आहे.

केरळातील मंत्री आणि अधिकारी विदेशात जाऊन मदतीसाठी विनवणी करीत आहेत हे दृष्य अवमानास्पद असेल असे त्यांनी म्हटले आहे. मदतीच्या नावाखाली केरळातील मंत्री विदेशी दौऱ्याची हौस भागवून घेण्याच्या तयारीत असल्याची टीकाही काही जणांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)