केरळ विरुद्ध दिल्ली एक डाव आणि 27 धावांनी पराभूत

थिरुवनंतपूरम: रणजी चषकाच्या ब गटात दिल्ली विरुद्ध केरळ यांच्यात झालेल्या सामन्यात केरळने दिल्लीला एक डाव आणि 27 धावांनी नमवून धक्कादायक विजयाची नोंद केली. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना केरळने 320 धावा बनविल्या होत्या.

प्रत्युत्तरात फलंदाजी करताना दिल्लीचा पहिला डाव 139 धावात आटोपला तर दुसऱ्या डावात त्यांना 154 पर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे दिल्लीवर एक डाव आणि 27 धावांनी पराभूत होण्याची नामुष्की ओढवली आहे.
दुसऱ्या डावात केरळसाठी संदीप वॉरियर याने 39 धावा देत 3 गडी बाद केली तर त्याला जलज सक्‍सेना याने 49 धावत 3 गडी बाद करत चांगली साथ दिली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)