केरळ पूरग्रस्तांना फेसबुकचा मदतीचा हात

नवी दिल्ली – केरळमध्ये अतिवृष्टीचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. पूर आणि भूत्सखलनामुळे ३०० पेक्षा अधिक अधिक नागरिकांचा मृत्यू झला आहे. तर १० हजारांपेक्षा जास्त नागरिक विस्थापित झाले आहेत. पूरग्रस्तांसाठी देशातील राज्यांसह बॉलीवूडचे कलाकार यांनी मदत केली आहे. यामध्ये लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग साईट फेसबुकनेही केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

फेसबुकने केरळ पूरग्रस्तांसाठी २ लाख ५० हजार डॉलरची मदत जाहीर केली आहे. ही मदत दिल्लीस्थित ‘गुंज’ या सामजिक संस्थेद्वारे केली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितले कि, मागील काही दिवसांपासून फेसबुक युजर्ससोबत मिळून लोकांपर्यंत पोहचणे, लाईव्ह, क्रिएटींग पेज, जॉईनिंग कम्युनिटी आणि फंड उभारणे यासारखे अभियान राबविले आहेत. यामधून जागतिक समुदायाने केरळ पूरबाधितांना २ लाख ५० हजार डॉलरचा फंड गोळा केला आहे.

दरम्यान, फेसबुकने ९ ऑगस्टपासून ‘सेफ्टी चेक’ फिचर सुरु केले आहे. या फिचरद्वारा लोक आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र-मैत्रिणींना सूरक्षित असल्याची माहिती देऊ शकतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)