मंचर-केरळ पूरग्रस्तांना वैद्यकीय मदतीसाठी गेलेले वैद्यकीय तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांचा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंचर येथे सत्कार करण्यात आला.
मंचर येथील शरद सहकारी बॅंकेची वार्षिक सभा मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी डॉ. सदानंद राऊत, डॉ. हनुमंत भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. सदानंद राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केरळ येथे पूरस्थितीत बाधित झालेल्या सुमारे 2200 रुग्णांवर वैद्यकीय उपचार केले. सुमारे 18 लाख रुपयांची सर्पदंशावरील लस, बायोलॉजिक ई चे मुख्य कार्यकारी अधिकारी महिमा तातला, अनिल यादव यांच्या सहकाऱ्यांनी तेथील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. डॉ सदानंद राऊत यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्वांनी येथे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)